कोल्हापूर/प्रतिनिधी- ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू सुनेचा विद्युत तारेला स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडमुडशिंगी गावात ही घटना घडलीय.मीना विष्णू येडेकर (वय 55) तर अनुराधा महेश येडेकर (वय 27) असे सासू सुनेचे नाव आहे.
वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरणने लक्ष दिले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून कंपनीवर गुन्हा नोंद करण्याची नागरिकांची मागणी केलीय. दरम्यान मृत सासू सुनेचे मृतदेह उत्तरीय तपासणी साठी कोल्हापूरातील सीपीआर हॉस्पिटल इथं पाठवण्यात आले आहेत.