करोनाचा हाहा:कार! हरियाणात संपूर्ण लॉकडाऊन

चंदीगढ – हरियाणा सरकारने 3 मे पासून सात दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन घोषित केला आहे. याबाबतची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी केली आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये या अगोदर शुक्रवारीच वीकेंड लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. आता संपूर्ण राज्यात सात दिवस कडक लॉकडाउन असणार आहे. हरयाणात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. राज्यात शनिवारी 125 कोरनाबाधितांचा मृत्यू देखील झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.