नवी मुंबई – कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरचा कर्णधार श्रेयसने संघात कोणताही बदल केलेला नाही. त्याचबरोबर दिल्लीच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. एनरिक नॉर्टजेच्या जागी वेगवान गोलंदाज खलील अहमदचे पुनरागमन झाले आहे.
🚨 Toss Update 🚨@KKRiders have elected to bowl against @DelhiCapitals.
Follow the match ▶️ https://t.co/4vNW3LXMWM#TATAIPL | #KKRvDC pic.twitter.com/KZqJgNQoTQ
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार ), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.
दरम्यान, दोन्ही संघांमध्ये आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये कोलकाताने 16 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी दिल्लीने 13 सामने जिंकले आहेत तर, एक सामना अनिर्णित राहिला आहे.
या मोसमात कोलकाताने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांनी चेन्नईवर सहा गडी राखून विजय मिळवला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात बंगळुरूने केकेआरचा तीन गडी राखून पराभव केला. तिसऱ्या सामन्यात कोलकाताने पंजाबचा सहा गडी राखून तर चौथ्या सामन्यात मुंबईचा पाच गडी राखून पराभव केला.
दुसरीकडे दिल्लीच्या संघाने मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबईविरूध्द विजय मिळवला होता. त्याचवेळी पुढील दोन सामन्यांमध्ये त्यांना गुजरात आणि लखनौविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.