फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार

सातारा (प्रतिनिधी) -लग्नाचे आमिष दाखवून, कारमध्ये जवळ बसवून काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत साताऱ्यातील एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून संग्राम महादेव घोरपडे आणि त्याला मदत करणाऱ्या अश्‍विनी महादेव घोरपडे, सुचिता महादेव घोरपडे, महादेव लक्ष्मण घोरपडे व प्राजक्ता मयूर धुमाळ (सर्व रा. समता पार्क, शाहूपुरी) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित युवती व संग्राम यांची ओळख होती. त्याने संबंधित युवतीला लग्नाचे आमिष दाखबून सदरबझार परिसरात एका महाविद्यालयाजवळ बोलावून घेतले. तेथे दोघे गाडीत बसल्यावर संग्राम युवतीला जवळ ओढून दोघांचा फोटो काढला. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सातारा, शाहूपुरी व महाबळेश्‍वर येथे वारंवार अत्याचार केला. पीडित युवती गरोदर राहिल्याने बाकीच्या संशयितांनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. संग्रामला मदत करण्यासाठी अन्य संशयितांनी पीडितेला दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.