शिमला – हिमाचलप्रदेशात नव्याने झालेल्या तुफानी बर्फवृष्टीमुळे तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत राज्यभरातील 470 वीज केंद्रे आणि 10 पाणीपुरवठा केंद्रांचे कामकाज या बर्फवृष्टीमुळे ठप्प झाले आहे. चार राष्ट्रीय महामार्गांसह तब्बल 176 रस्ते अद्यापही बंद आहेत.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत लाहौल-स्पीती, किन्नौर, चंबा, कुल्लू आणि किन्नौरमध्ये नव्याने हिमवृष्टी झाली आहे. लाहौल-स्पिती जिल्ह्यात एकूण 176 पैकी 136 रस्ते बंद आहेत.
या जिल्ह्यातील केलॉन्ग येथे उणे 3.5 अंश सेल्सिअस, कुकुमसेरी येथे उणे 1.3 अंश सेल्सिअस, किन्नौरमधील कल्पामध्ये उणे -0.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तसेच राज्याच्या अनेक भागातील तापमान शुन्य अंशाच्याही खाली गेले आहे. तथापि येत्या दोन दिवसांत येथील स्थिती सुधारून तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.