सुरत : देशात काही राज्यात पावसाचा तांडव अजूनही सुरू आहे. त्यात गुजरातमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे इथले जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान, जुनागडमध्ये मुसळधार पावसानंतर रस्त्याचा पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Gujarat: Many cars damaged after a bridge collapsed near Malanka village in Junagadh in Gujarat yesterday. No casualties reported. More details awaited. pic.twitter.com/S1gKhyP7Oi
— ANI (@ANI) October 7, 2019
पूल कोसळला त्यावेळी पुलावर काही गाड्यांची ये-जा सुरू होती. त्यातच अचानक पुल कोसळला. त्यामुळे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी गाड्यांमध्ये असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुसळधार पावसामुळे पुलाखालून जमीन घसरली होती, त्यामुळे पूल कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. पूल कोसळल्यामुळे 500 मीटरपर्यंतच्या रस्त्यावर दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर रस्ता बंद झाला असून वाहनांना दुसऱ्या मार्गावरुन जावे लागले.