तोरणमाळ सिंदिदिगर रस्त्यावर कार दरीत कोसळुन आठ जणांचा मृत्यू; चार गंभीर

नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग असणाऱ्या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक करणारी खासगी क्रुजर गाडी दरीत कोसळुन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर चार प्रवाशी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळपास पंधराहुन अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

प्रत्यक्षादर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी शमलेट ता. पाटी जिल्हा बडवणी मध्यप्रदेश येथील रहिवाशी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी येत होते. त्यापैकी 8 जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. 4 जण गंभीर जखमी आहेत.

सायंकाळच्या सुमारास ही क्रुझर गाडी या घाटातून प्रवाशांना घेऊन जात होती. अतिशय खडतर असलेल्या या भागात नुकताच पंतप्रधान ग्रामिण सडक योजनेतुन रस्ता बनला आहे. स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच हा भाग तोरणमाळ सोबत जोडला गेला आहे. अवघ्या सहाच महिन्यात या रस्तावर हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने आणि खडतरही असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहे.

पोलिस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य राबवत आहेत. जखमींना तोरणमाळ, म्हसावद याठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येत आहे. तर जिल्हा मुख्यालयातुन पोलिस अधिक्षकांसह अनेक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. प्रशासनाने अद्यापही कुठलीही माहिती दिली नसुन याठिकाणी नेटवर्क नसल्याने माहिती मिळण्यात अडसर निर्माण होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.