नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियात झालेल्या एका रग्बी सामन्यात एका महिलेने असा काही प्रकार केला ज्यावरून जगभर चर्चा सुरू झाली. तसेच तिच्या या फोटो-व्हिडिओची ही सर्वत्र चर्चा आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या रग्बी लीगमधील गोल्ड कोस्ट टायटन्स ( Gold Coast Titans ) आणि पॅरामाटा ईल्स (Parramatta Eels) यांच्यातील सामन्या दरम्यान एक महिला टॉपलेस होऊन स्टेडियमच्या स्टँडवरून थेट मैदानात घुसली आणि त्यामुळे सामना थांबवावा लागला.
आता या महिलेबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जाव्हॉन जोहानसन ( Javon Johanson ) असे या महिलेचे नाव असून, तिच्या मित्रमंडळींनी सांगितले की, ती असं काहीतरी करणार आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
दरम्यान, जाव्हॉन जोहानसन म्हणते की, असे करणे हा तिच्या बकेट लिस्टचा भाग होता. म्हणूनच ती या क्षणाची वाट पाहत होती. जाव्हॉन जोहान्सनने टाॅपलेस ( Topless Javon Johanson ) होत मैदानात प्रवेश केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला आहे.
Video | अन्…टॉपलेस होऊन महिला थेट चालू सामन्यातच मैदानात घुसली; फोटो-व्हिडिओची जगभरात चर्चा
सविस्तर बातमी https://t.co/r8OGupKRSt
व्हिडिओ 👇👇👇👇👇👇 pic.twitter.com/rYqOw5Gr0h— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) April 12, 2022
जाव्हॉन जोहान्सनने मैदानात प्रवेश करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला घेरले आणि मैदानाबाहेर नेले. पण या प्रकारावर आता सोशल मीडियात वाद सुरू झाला आहे. पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला ज्या पद्धतीने मैदानाबाहेर नेले ती पद्धत चुकीची असल्याचे काहींनी म्हटले आहे तर काहींनी जाव्हॉनने जो काही प्रकार केला त्यावर नाराजी व्यक्त करत तिच्या कृतीला चुकीचं म्हटले आहे.
टाॅपलेस होण्याचे कारण सांगताना जाव्हॉन जोहानसनने सांगितले की, तिच्या मैत्रिणींनी तिला चॅलेंज दिले होते. मैत्रिणींनी दिलेले हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी हा प्रकार केला. यात विचार करण्यासारखे काही नव्हते. त्यांनी मला चॅलेंज दिले होते. मला जे करायचे होते ते मी केले. यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही, असं देखील तिने स्पष्ट केलं.
दरम्यान, फॅन अशाप्रकारे मैदानात घुसण्याची ही पहिलीच वेळ नाही. क्रिकेट असो की फुटबॉल, अनेकदा मैदानात अशा गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत.