Inshanullah Janat banned : अफगाणिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजाविरुद्ध मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आयसीसीने इंशानुल्लाह जनत याला क्रिकेटशी संबंधित सर्व उपक्रमांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. तसेच आयसीसी आणखी तीन क्रिकेटपटूंची चौकशी करत आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर इंशानुल्लाह जनतवर फिक्सिंगचे आरोप झाले आहेत. यानंतर संघाच्या युवा फलंदाजावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूने एसीबी (ACB) आणि आयसीसी (ICC) अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केल्याचा आरोप स्वीकारला आहे.
🚨 BREAKING: Top-order batter Ihsanullah Janat has been banned for 5 years from all cricketing activities for breaching ACB and ICC Anti-Corruption Codes during KPL2. He admitted to violating Article 2.1.1 of the ICC Code.
🔗: https://t.co/6wDujqf7TC#ACB | #ACU pic.twitter.com/xqQ91fz17Q
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 7, 2024
वयाच्या 19 व्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंमध्ये इंशानुल्लाह जनतची गणना केली जाते. त्याने अफगाणिस्तानसाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने खेळले आहेत. त्याने अफगाणिस्तानसाठी तीन कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. जनत हा अफगाणिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार नवरोज मंगलचा धाकटा भाऊ आहे.
आयसीसीच्या अहवालानुसार, काबुल प्रीमियर लीगच्या सीझन-2 मध्ये इंशानुल्लाह जनत भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. 26 वर्षीय इंशानुल्लाह जनतवर 7 ऑगस्ट रोजी बंदी घालण्यात आली आहे. पण तरीही अफगाणिस्तान क्रिकेटचा त्रास इथेच संपत नाहीये.
अफगाणिस्तानच्या आणखी तीन क्रिकेटपटूंचा भ्रष्टाचारात सहभाग आहे का, याची चौकशी करत असल्याची माहितीही आयसीसीने दिली. प्रथमदर्शनी हा पुरावा पुरेसा वाटतो. या तिघांची चौकशी सुरू असून लवकरच निर्णय येईल. आणि त्यांच्या गुन्ह्याच्या पुष्टीच्या आधारावर निर्णय घेतला जाईल. मात्र, आयसीसीने या क्रिकेटपटूंची नावे जाहीर केलेली नाहीत.