Tamil Nadu Politics: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये अखेर अभिनेते विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन जागा जिंकलेल्या VCK पक्षाने विजय यांच्या TVK पक्षाला अधिकृत पाठिंबा दिल्याने बहुमतासाठी आवश्यक 118 आमदारांचा आकडा पूर्ण झाला आहे. TVK नेते अधव अर्जुना यांनी VCK नेतृत्वासोबतचा समर्थनपत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत “व्हिक्टरी” अशी प्रतिक्रिया दिली. गेल्या पाच दिवसांपासून VCKच्या पाठिंब्याबाबत चर्चा सुरू होती. VCK प्रमुख थिरुमावलवन यांनी शुक्रवारी सकाळीच TVKला पाठिंबा देण्याची सार्वजनिक घोषणा केली होती. मात्र, औपचारिक समर्थनपत्र उशिरापर्यंत न दिल्याने विजय यांच्या शपथविधीला पुन्हा विलंब झाला. Tamil Nadu Politics: अभिनेते ‘विजय’च होणार मुख्यमंत्री; बहुमतासाठी आवश्यक 118 आमदारांचा आकडा पूर्ण सरकार स्थापनेसाठी बहूमताचा आकडा पार – (Tamil Nadu Politics) विजय यांच्या टीव्हीकेला 4 पक्षांचे समर्थन मिळाले आहे. टीव्हीके जागा 108 (एक कमी होणार, कारण विजय दोन ठिकाणी निवडून आलेत), काॅंग्रेस -5, सीपीआय 2, सीपीआय एम 2, व्हीसीके 2, एकूण जागा होत आहेत 119 , बहुमतासाठी आवश्यक आहेत 118 त्यामुळे विजय यांनी आता बहूमताचा टप्पा गाठला आहे. राज्यपालांकडे विजय यांची तिसरी भेट – (Tamil Nadu Politics) अभिनेते विजय यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र, त्यांच्याकडे 116 आमदारांचेच समर्थनपत्र असल्याने राज्यपालांनी आवश्यक बहुमताचा पुरावा सादर करण्यास सांगितले होते. यापूर्वी 6 आणि 7 मे रोजीही विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र, 118 आमदारांचे समर्थन नसल्याने राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यास नकार दिला होता. काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती – दरम्यान, राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसने आपल्या पाच आमदारांना हैदराबादला रवाना केल्याची माहिती समोर आली आहे. काॅंग्रेसनेही विजय यांना समर्थन दिले आहे. मात्र संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. निकालानंतरच्या प्रमुख घडामोडी – 4 मे : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; TVK 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र स्पष्ट बहुमत नाही. 5 मे : TVKने सहयोगी पक्षांशी चर्चा सुरू केली; काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. 6 मे : TVK विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विजय यांची नेतेपदी निवड; 113 आमदारांचे समर्थनपत्र राज्यपालांकडे सादर. 7 मे : विजय यांची राज्यपालांशी दुसरी भेट; 118 आमदारांचे समर्थन सादर करण्यास सांगितले. 8 मे : राज्यपालांकडून निमंत्रण मिळण्यात विलंब झाल्याने TVK सर्वोच्च न्यायालयात दाखल; सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेची संधी देण्याची मागणी. 9 मे : VCKचा अधिकृत पाठिंबा मिळाल्यानंतर बहुमताचा मार्ग मोकळा; शपथविधीची प्रतीक्षा कायम.