Donald Trump on iran: आखातातले युद्ध आता चांगलेच पेटणार असल्याचे दिसत आहे. कारण दोन्ही देशातील चर्चेनंतर आजपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यातच अमेरिकेने इराणने आमच्यासोबत डील न केल्यास त्यांच्यावर नौसेना कारवाई करेल अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर इराणने थेट अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला केला. त्यामुळे या हल्ल्याने राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, “जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांना सोबत नेणाऱ्या अमेरिकी जहाजांवर हल्ला केला, तर त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकीन” अशी धमकी दिली आहे. ट्रम्प यांचे फॉक्स न्यूजला दिलेले हे विधान अशा वेळी आले आहे. जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्देशानुसार यूएस सेंट्रल कमांडने सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’चा भाग म्हणून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. Donald Trump on iran: ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दावा केला की, “इराणने या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला केला आहे, ज्यात एका दक्षिण कोरियन मालवाहू जहाजाचाही समावेश आहे.” ही सामुद्रधुनी २८ फेब्रुवारी रोजी इराणसोबत युद्ध सुरू झाल्यापासून प्रभावीपणे बंद आहे. या युद्धात दक्षिण कोरिया सामील होईल का? Donald Trump on iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, “इराणने ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ अंतर्गत जहाजांच्या हालचालींशी संबंधित इतर अनेक देशांना लक्ष्य केले आहे, ज्यात एका दक्षिण कोरियन मालवाहू जहाजाचाही समावेश आहे. कदाचित आता दक्षिण कोरियाने या मोहिमेत सामील होण्याची वेळ आली आहे.” असे म्हणाले आहेत. अमेरिकेचे जगभरात लष्करी तळ Donald Trump on iran: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, अमेरिकी लष्कराने सात लहान बोटींना लक्ष्य केले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील या कारवाईत सामील होण्याचे आवाहन दक्षिण कोरियाला केले. “आमच्याकडे पूर्वीपेक्षा अधिक प्रगत शस्त्रे आणि दारुगोळा आहे,” असे ट्रम्प म्हणाले. “आमच्याकडे सर्वोत्तम उपकरणे आहेत. जगभरात आमचे अस्तित्व आहे. जगभरात आमचे लष्करी तळ आहेत. हे सर्व लष्करी तळ उपकरणांनी परिपूर्ण आहेत. आम्ही या सर्वांचा वापर करू शकतो आणि गरज पडल्यास नक्कीच करू.”