सरकारकडून दडपशाहीचे राजकारण !

सुप्रिया सुळे यांचा आरोप : नोटबंदी, जीएसटीमुळे वाढली देशातील बेरोजगारी
15 शहरांतील संवादयात्रेत सहभागी होणार
विरोधक बोलणारच; ते तर सुदृढ लोकशाहीचे लक्षण

नगर  – सध्या राज्यात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. विरोधकांना ईडी, सीबीआयची भीती घातली जाते. 2014 सालच्या अगोदर हे शब्द एव्हढे प्रचलित नव्हते. चौकशी पारदर्शक व्हावी. आमच्याकडे असला की तो वाईट त्यांच्याकडे गेला की त्याला क्‍लीनचीट असले मनी आणि मसल पॉवरचे राजकारण सध्या सुरू आहे, असा आरोप खा. सुप्रिया सुळे यांनी केला.

संवाद यात्रेच्या निमित्तने नगर शहरात आल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जि.प. उपाध्यक्षा राजश्री घुले, निर्मलाताई मालपाणी, आठरे आदी उपस्थित होते. नोटबंदी मुळे भ्रष्टाचाराला आळा बसला नाही, त्यातच जीएसटी लागू केली या धबडग्यात काही धोरणे कुचकामी ठरली. त्यात मंदीची लाट आल्याने बेरोजगारीचे संकट उभे ठाकले असल्याची कबुली प्रत्यक्ष रिझर्व्ह बेंकेने दिली त्याला अर्थमंत्र्यांनीही दुजोरा दिल्याने. परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविले नाहीतर बेरोजगारीची समस्या आणखा तीव्र होईल.

विधानसभेचा माहोल तयार होवू लागला आहे. संघटनेच्या प्रत्येक प्रतिनिधींनी केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. राज्यातील 15 शहरांमध्ये जावून तेथील एन.जी.ओ., वकील, डॉक्‍टर्सच्या संघटनांच्या भेटीगाठी घेवून त्यांच्याशी संवाद साधून पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी माझ्यावर सोपविली आहे. आतापर्यंत मी तीन शहरांना भेटी दिल्या आहेत.

लोकसभेत नुकतेच डॉक्‍टरांच्या संदर्भातील बील पास झाले त्यातील अटी डॉक्‍टरांसाठी अत्यंत जाचक आहेत, नोटबंदी मुळे भ्रष्टाचाराला आळा बसलेला नाही त्यातच जीएसटी लागू केल्याने बेरोजगारीचं आव्हान समोर उभं असल्याची कबुली रिझर्व्ह बॅंकेनेच दिली आहे. सध्या पारलेची स्थिती आपण पाहतच आहोत, टाटा मोटर्स मध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पियागोने तीन दिवस कामकाज बंद ठेवलय, शेअरमार्केट कोसऴतंय, बॅंकिंग चार्जेस मोठ्या प्रमाणावर आकारले जात आहेत. नव्या तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही मात्र निर्माण होणाऱ्या समस्येला वेळीच रोखल नाही तर अवघड परिस्थिती निर्माण होईल.

कर्जमाफीचे किती पैसे शेतकऱ्यांना मिळाले असा सवाल करून कोर्टात गेल्यानंतर थोडे फार पैसे मिऴाले. असे सांगून बेरोजगारी कमी करणे या समस्येला आमचे प्रथमप्राधान्य आहे. राज्यातील सर्व एम.आय.डी.सी. या आमच्या काळात उभ्या राहिल्या. उद्योजक कल्याणींच्या मते मेक इन इंडियाची संकल्पना चांगली मात्र तिची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने होतेय.

मुख्यमंत्री मेक इन इंडीया संदर्भात दाखवित असलेल्या चित्राबद्दल बोलतांना राज्य जर अव्वल दर्जा राखून असेलतर त्याचे स्वागत करू पण डाटा मॅच होत नाही असा टोला मारतांनाच चांगला बदल होत असेल तर तो घडविला पाहिजे या मताचे आम्ही आहोत असे खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विरोधक बोलणारच तेच सदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. राजकारण नैतिकतेने केले पाहिजे. विरोधकही दिलदार असायला हवा. मात्र हल्ली तसे दिसत नाही. असे सध्याचे दुर्दैवी राजकारण सुरू आहे. मात्र सत्त्यासाठी लढेंगे अशी आमची भूमिका आहे, मग तुम्ही कितीही खच्चीकरण करा. मी लोकशाही मानणारी आहे. तेव्हा कोणाचेही सरकार आले तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचेच सरकार येणार अशी कोपरखळीही सुळे यांनी मारली.

पिचड यांनी पक्ष सोडल्याचे दुःख
पिचड यांचा आणि आमचा 40 वर्षांचे घरोब्याचे संबंध होते, कोणतेही कारण नसताना ते पक्ष सोडून गेले याचं वाईट वाटतं. पवार साहेब कोणाकडेच कधीही मन मोकळे करत नाहीत. त्यांनी राजकारणात अत्यंत चांगले आणि अवघड दिवस अनुभवले आहेत ते कधीच पलटवार करीत नाहीत.

किल्लारी भूकंपाच्या वेळी पवार सगळी यंत्रणा घेवून 15 दिवस तेथेच राहिले. आज कोल्हापूर-सांगली मध्ये किती नेते गेले. गेल्या 50 वर्षांत पवारांनी राज्यभर एमआयडीसी उभारल्या. रोजगार निर्मिती करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळख दिली. आज माझ्या मतदार संघातील एमआयडीसीत 6 लाख नागरिकांना रोजगार मिळाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)