कोल्हापुरात पूरग्रस्तांना वस्तू वाटपावेळी दोन गटांत हाणामारी

८ जण जखमी

कोल्हापुर : पुरग्रस्त मदत वाटप सुरू असताना यादीत नाव घालण्यावरून दोन कुटुंबात हाणामारी झाली. यामध्ये ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडणगे येथे घडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हयातील पूरग्रस्तांना विविध सेवा भावी संस्था, व्यक्ती, तरूण मंडळांकडून मदत वाटप केली जात आहे. करवीर तालुक्यातील वडणगे गावालाही महापुराचा फटका बसला होता. चर्च जवळील असणाऱ्या एका वसाहतीतील पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी आकाश भालेकर आणि ज्ञानू भालेकर यांच्यात वाद झाला.

या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये आकाश भालेकर, शिवाजनी भालेकर, याकूब भालेकर,आणि राणी दाभाडे या एका गटाचे तर दुसर्‍या गटाचे ज्ञानू भालेकर, अनिल भालेकर, जायनाबाई भालेकर आणि आकाश भत्तलेकर असे दोन्ही गटाचे मिळून आठ जण जखमी झाले आहेत. या सर्वाना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात 13 जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)