जागेच्या वादातून डोक्‍यात मारले फावडे

अरणगाव येथील घटना : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर – तालुक्‍यातील आरणगाव येथे जागेच्या वादातून एकाच्या डोक्‍यात फावडे मारून जखमी केले. तसेच दोन महिलांना लाथाबुक्क्‌यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची मंगळवारी घडली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात पाच जनाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंद पर्वती गहिले, मोहन गोविंद गहिले, स्वाती मोहन गहिले, रोहीबाई गोविंद गहिले, प्रतीक राजेंद्र गहिले (सर्व रा. अरणगाव, ता. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सुनील विठ्ठल गहिले (रा. अरणगाव) हे जखमी झाले आहेत. गोविंद गहिले यांनी रस्त्यात झाड का लावले, अशी विचारणा सुनील यांनी केली.

त्यामुळे गोविंद व इतरांनी ही जागा आमची आहे. तुझा काय संबंध, असे म्हणून सुनील यांच्या डोक्‍यात फावडे मारून दुखापत केली. तसेच इतरांनींही सुनील गहिले यांची पत्नी व आईला लाथाबुक्क्‌यांनी मारहाण करून, जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या जबाबावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.