पाटपाण्यासाठी भातकुडगाव फाट्यावर रास्तारोको

शेवगाव-पाथर्डी संघर्ष कृती समितीच्या वतीने दोन तास आंदोलन

भाविनिमगाव  – शेवगाव तालुक्‍यातील भातकुडगाव फाटा येथे शेवगाव पाथर्डी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ओव्हरफ्लोचे पाटपाणी मोफत मिळावे या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आंदोलनात सभापती डॉ. क्षितीज घुले, आप्पासाहेब फटांगडे, बाळासाहेब जाधव, रविंद्र लोढे, राजेंद्र आढाव, अनिल मडके, अण्णासाहेब शिंदे, अशोक मेरड, अशोक देवढे, विठ्ठल आढाव, राजेंद्र फटांगरे, भगवान आढाव, सखाराम लव्हाळी, तुकाराम जाधव, बबन जाधव, आण्णासाहेब लोढे, बाळासाहेब धोंडे, बाळासाहेब दुकळे, शंकर नारळकर, नंदकुमार शेळके, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदिप बामदळे, चित्तरंजन घुमरे, भिमराज बेडके, रामभाऊ साळवे, एकनाथ काळे, संदिप बडे, पाराजी नजन, आबासाहेब राऊत, बाबासाहेब खंबरे, सचिन फटांगरे आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी दहातोंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी आधी बंधारे भरून घेणार व नंतर शेतीला पाणी दिले जाईल व हे सर्व दोन दिवसात मार्गी लावण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील राहु असे आश्‍वासन दहातोंडे यांनी दिले. ओव्हरफ्लोचे पाटपाणी मोफत देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलुन निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)