कोपरगावात महिलेवर धर्मांतरासाठी दबाव

-पोलिसांकडून एकास अटक 
-न्यायालयाकडून पोलीस कोठडी

कोपरगाव – कोपरगाव शहरातील एका विवाहित महिलेशी गैरवर्तन करून धर्मांतर करण्यास दबाव आणून विनयभंग करून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी आर्शद हमीद मंसुरी (रा. इंदिरानगर) यास अटक करण्यात आली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, कोपरगाव शहरामध्ये पीडित महिलेच्या पतीचे दुकान आहे. पती बाहेरगावी गेल्यानंतर सदर महिला दुकान सांभाळते. आर्शद मन्सुरी हा महिलेचा पती नसताना वारंवार दुकानात येऊन लागला. तसेच तिचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला वारंवार कॉल करू लागला. डिसेंबर 2018 ते 20 जून 2019 दरम्यान खंडणी मागून धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता. तसेच वारंवार विनयभंग, शिवीगाळ व दमदाटी केली.

दरम्यान पती घरी आल्यावर पीडितेने सर्व हकीकत त्याच्या कानावर घातली.
गुरुवारी (दि.22) दुपारी पीडित महिला व तिच्या पतीने कोपरगाव शहर पोलिसात मन्सुरीविरुद्ध फिर्याद दाखल केली. गुन्हा दखल झाल्यावर पोलिसांनी आरोपी मन्सुरी यास अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भालेराव करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.