डाळिंब व कांद्याची आवक
कोपरगाव बाजार समिती डाळिंबाच्या 765 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर एक 1550 ते 2786 रुपये, डाळिंब नंबर दोन 800 ते 1500 रुपये, डाळिंब नंबर तीन 100 ते 750 रुपये.
कोपरगाव – कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्यांच्या कालावधीनंतर दोन हजारांहून अधिक म्हणजे दोन हजार 412 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. आवक घटली असून, परराज्यातही कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने उसळी घेतली आहे.
कांद्याच्या दराला झळाळी आली असून, या आठवड्यात कांद्याने दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यात आता पुन्हा तब्बल चारशे रुपयांची वाढ झाली आहे. कोपरगाव बाजार समितीत सध्या 4 हजार 100 रुपये क्विंटल इतकी आवक होत असून, कांद्या नंबर 1-2100 ते 2412 नंबर 2 1800 रुपये ते 2000, गोल्टी कांदा 1800 रुपये ते 2200, खाद 1100 ते 1600 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत आहे. कोपरगाव बाजार समितीत किमान 1600 रुपये, कमाल 2412 रुपये, तर सरासरी 1800 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत आहे. चांद कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे.
बाजार समितीत पाच दिवस डाळिंब, कांदा व भुसार मालाचा लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांदा आणावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. मध्यप्रदेश, राज्यस्थानातील कांद्याचा हंगाम लवकर संपला. आता चाळीतील कांदा संपल्यात जमा आहे. अपुऱ्या पावसाने नवीन लाल कांद्याचे पीक अर्धाहून घटल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरात वधारणा झाली आहे.