सासऱ्याकडून विनयभंग, तर पतीकडून मारहाण

पिंपरी – एका विवाहितेचा तिच्या सासऱ्यानेच विनयभंग केला. या प्रकरणी विवाहितेने आपल्या पतीला सांगितले असता त्याने पत्नीचेच डोके फरशीवर आपटून जखमी केले. ही घटना दिघी येथे घडली.

याबाबत विवाहितेने आपल्या 30 वर्षीय पती आणि 56 वर्षीय सासऱ्यांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला असून 30 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 2015 ते 21 ऑगस्ट 2019 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून घरगुती कारणावरून विवाहितेचा छळ केला. तसेच सासऱ्याने विनयभंग केला. ही बाब विवाहितेने पतीला सांगितली असता तू खोटे बोलत आहे, असे म्हणत तिचे डोके फरशीवर आपटून तिला जखमी केले. महिला पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.