महावितरणच्या कार्यालया बाहेर गांधीगिरी !

नगर – रंगारगल्ली येथील महावितरण कार्यालय कायम बंद असते तसेच या कार्यालयात असणारा फोन हि कधीही उचलत नाही. या मुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. हेलपाटे मारावे लागतात.

शहरात महावितरणच्या मनमानी कारभारामुळे अनेक वेळा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक नागरिकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. या महावितरणच्या मनमानी कारभारच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू जाधव यांनी गांधीगिरी करत रंगारगल्लीच्या कार्यालयाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी दत्तात्रीय ताटीकोंडा, अनिल गोंधळे, अक्षय दासार, राहुल गोंधळे, आकाश ताडला, ऋषिकेश बिडकर, प्रीतेश गुगळे, रुपेश यंगूपटला उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुधवारी दुपारपासून रंगारगल्ली येथील महावितरणाचे कार्यालय हे बंद होते. दुपारनंतर नगर शहरात पाऊस झाला. त्यानंतर अनेक भागात लाईट गेल्या होत्या त्यामुळे नागरिक आपल्या अडचणी सांगण्यासाठी या कार्यालयात वारंवार फोन करत होते. पण फोनचं उचलला जात नसल्यामुळे या कार्यालयजवळ नागरिकांची गर्दी जमा झाली. पाऊस बंद होऊन दोन तास झाले तरी लाईट आली नाही आणि कार्यालयही बंद असल्यामुळे नागरिकांना काहीही कळेना याबाबतची तक्रार त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू जाधव यांच्या कडे केली.

त्याठिकाणी पोचल्यावर त्यांनी हि कार्यालय बंद आढळले. जाधव यांनी आजूबाजूला राहणारे नागरिकांना विचारले त्यांनीहि हेच सांगितले दुपारपासून हे कार्यालय बंद आहे. सारखा फोन वाजत आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस वसाहत मधील एका हुशार विद्यार्थींनीचा महावितरणचा निष्काळजीपणामुळे जीव गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)