अधिकारी-ठेकेदारांचे साटेलोटे

घरचा आहेर : नगरसेवक संदीप वाघेरे यांचा आरोप

पिंपरी – एकाच ठेकेदाराला पाणीपुरवठा विभागातील कामे दिली आहेत. यामागे अधिकारी, ठेकेदार यांचे संगनमत असल्याचा आरोप भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भर महासभेत केला. महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

शहरातील पाणी प्रश्‍नावर चर्चा सुरू असताना संदीप वाघेरे यांनी महापालिका प्रशासनाच्या ठेकेदारधार्जिण्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले की, पाण्यासारखा मुलभूत प्रश्‍न प्रशासनाला सोडविता आला नाही. पाणीपुरवठा यंत्रणेतील ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. एकाच ठेकेदारांना महापालिकेने अनेक कंत्राटे दिली आहेत.

महापालिका ठेकेदारांना नाहक पोसत आहे. हे ठेकेदार महापालिकेचे जावई आहेत का, असा संतप्त सवाल वाघेरे यांनी केला. आयुक्‍तांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिले नाही. दहा वर्षांपासून पवना बंदिस्त पाईपलाईनचे घोंगडे भिजत ठेवले आहे. अडीच वर्षात भाजपकडून दिसेल अशी विकासकामे झाली नाहीत. तसेच आयुक्‍तांकडून देखील कामे झाली नाहीत. पाणी कुठे तरी मुरतंय, पाणीपुरवठा अधिकारी पाण्याचे नियोजन करण्यात का अपयशी ठरत आहेत? याची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी संदीप वाघेरे यांनी केली. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×