मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आ. पाटलांकडून धनादेश सुपूर्त 

कराड – सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातून वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक मदतीचा ओघ सुरु आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे मदत स्वरूपात आलेले धनादेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून सुपूर्त करण्यात आले. top news marathi latest news Checks delivered by Patil

यावेळी कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, पालचे सरपंच जगन्नाथ पालकर, भास्करराव गोरे, उद्धवराव फाळके, सचिन लवंदे, मुकुंद खंडाईत, आप्पासाहेब खंडाईत, युवराज गोरे, बाबा शेळके, सैनिक घाडगे, संजय काळभोर तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. पूर ओसरल्यानंतर अजूनही अनेक कुटुंब स्थिरस्थावर झालेली नाहीत. पुरामध्ये बाधित झालेल्या कुटुंबांचे दैनंदिन जनजीवन स्थिरस्थावर व्हावे यासाठी कराड उत्तर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. आ. बाळासाहेब पाटील यांनी यांच्याकडे अनेकांनी मदत दिली आहे. या मदतीचा धनादेश आ. बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)