भोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी – सिगारेटचे पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तरुणावर खूनी हल्ला करण्यात आला. ही घटना भोसरी येथे शुक्रवारी (दि. 23) रात्री घडली. top news marathi latest news
Bloody cigarette attack on young man

अजय चव्हाण, किरण पवार, प्रमोद वाघमारे, किशोर पवार (सर्व रा. भोसरी) आणि चार साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दत्तात्रय राजेंद्र धायगुडे (वय 26, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्यावर कासारवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषीकेश सुरेश पवार (वय 21 रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अजय चव्हाण आणि किरण पवार यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, जखमी आणि त्यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मित्र काही कामानिमित्त भोसरी येथे आले होते. ते सिगारेट घेण्यासाठी भोसरीतील शास्त्री चौकात असलेल्या आरोपींच्या टपरीवर थांबले. सिगारेटचे जास्त घेतल्याच्या कारणावरून आरोपी आणि जखमी तरुणामध्ये बाचाबाची झाली. यावेळी चिडलेल्या आरोपींनी दत्तात्रय यांना जबर मारहाण केली.

या मारहाणीत जखमी झालेल्या दत्तात्रय यांना त्यांच्या मित्रांनी मोटारीत बसविले. त्यानंतरही आरोपी किशोर पवार याने त्यांचे मोटारीवर गाडीवर दगड मारून काच फोडली. दगड का मारला हे विचारण्यासाठी फिर्यादी षीकेश व त्यांचे मित्र मोटारीच्या बाहेर आले. त्यावेळी आरोपीनी जखमी दत्तात्रय यांना पुन्हा लाकडी दांड्याने डोक्‍यात मारून जखमी केले. स्वतःचा बचाव करण्यासाठी ते पळुन जात असताना आरोपीनी त्यांना खाली पाडून डोक्‍यात दगड, विटा व लाकडी दांड्याने मारून जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)