पुणे-नगर रस्त्यावर प्रवासी महिलेला लुटले

शिक्रापूर  – पुणे नगर रस्त्यावर प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडत असताना सणसवाडी येथून बसलेल्या एका प्रवाशाला मागील आठवड्यात हातपाय बांधून मारहाण करून लुटल्याची घटना घडलेली असताना आता पुन्हा एका महिलेला मारण्याच्या धाकाने शिक्रापुरात लुटले असल्याची घटना घडली आहे.

महिलेच्या जवळील पिशवीतील चार हजार रुपये व साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन कारचालक पसार झाला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शकीला मन्सूर मुलाणी (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे लूट झालेल्या महिलचे नाव आहे. शिक्रापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.