Odisha Train Accident – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी सुरू केली आहे. याबाबत रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीआयच्या १० सदस्यीय पथकाने सोमवारी बालासोर रेल्वे अपघातस्थळी भेट दिली आणि अपघाताची चौकशी सुरू केली. ईस्ट कोस्ट रेल्वे अंतर्गत खुर्द रोड विभागाचे डीआरएम रिंकेश रे म्हणाले की, ‘त्यांना मिळालेल्या माहितीनुसार बालासोर येथील रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. मात्र यासंपूर्ण चौकशीबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.’ रेल्वे बोर्डाने रविवारी या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती.
तत्पूर्वी, रेल्वे सुरक्षा आयुक्त शैलेशकुमार पाठक यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी बहनगा बाजार रेल्वे स्थानकातील नियंत्रण कक्ष, सिग्नल रुम आणि सिग्नल पॉईंटलाही भेट दिली. आम्ही तुम्हाला सांगतो की, 3 जून रोजी बालासोर येथील गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (GRP) रेल्वे अपघाताबाबत भारतीय दंड संहिता आणि रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Odisha Train Accident : बंगालमधील मृतांच्या कुटूंबीयांना सरकारी नोकऱ्या, ममता बॅनर्जींची घोषणा