स्वच्छ सर्वेक्षणात मनपा राज्यात अव्वल

नगर  – केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा आज अखेरचा दिवस आहे. शहर स्वच्छतेचा फीडबॅक पाठविण्यात नगर मनपाचे राज्यातील अव्वल स्थान कायम आहे. आज सायंकाळपर्यंत 86 हजार 2 प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत. प्रतिक्रियांसाठी आज रात्री 12 वाजेपर्यंत मुदत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत नगर शहराच्या स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद (फीडबॅक) मोबाईल ऍपव्दारे संकलित करण्यात आला आहे.

शहराच्या सुमारे साडेचार लाख लोकसंख्येच्या दहा टक्के म्हणजे सुमारे 50 हजार नागरिकांनी स्वत:हून फीडबॅक देणे अपेक्षीत आहे. शहरातील स्वच्छतेबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी मनपा प्रशासनाकडून मोबाईल ऍपची सोय करण्यात आली. एसएस 2020 वोट फॉर युअर सिटी असे या ऍपचे नाव आहे. वोट फॉर युअर सिटी ऍपवर 81 हजार 918, एसएस 20 ऍप 3415, स्वच्छता ऍप 616, 1969 कॉल 53, असे एकूण 86 हजार 02 प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या पथकाकडून सर्वेक्षण अंतर्गत शहरातील स्वच्छतेची तपासणी करण्यात आली. पथकाने नागरिकांशी संवाद देखील साधला. प्रतिक्रियेसाठी आज रात्री बारावाजेपर्यंत मुदत असल्याने जास्तीत प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गतवेळी मनपा देशात 274 स्थानावर होती. यावेळी शंभरच्या आत येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. मार्च महिन्यात स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.