…अन्यथा भविष्यातील वाटचाल कठीण बनेल – सात्विक साईराज

नवी दिल्ली – भारताचा दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी याला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्याला सराव शिबिरात सहभागी होता येणार नसल्याने भविष्याची चिंता वाटत असल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्‍त केली आहे. 

मला करोना झाल्याचे समजल्यावर आता पुढील चाचणीवर सर्व काही अवलंबून आहे. यातून लवकर बरा झालो तरच स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल अन्यथा भविष्यातील वाटचाल कठीण बनेल, असेही तो म्हणाला. 

दरम्यान, करोनाचा धोका अद्याप कायम असल्यामुळे जागतिक बॅडमिंटन महासंघाने इंडियन ओपन व सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा रद्द केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.