जय पवारांवरही दबाव-रोहित पवार Top 10 news: बारामती विमान दुर्घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी घेत असून नुकतीच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली. मी सीबीआय, DGCA आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे वेळ मागितलीय, पण मी विरोधातील आमदार आहे, त्यामुळे कदाचित वेळ मिळत नसेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं.दरम्यान, जय पवारांवर पत्रकारपरिषद घेऊ नये म्हणूनंदाबावं टाकण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. प्रफुल्ल पटेल स्वतः म्हणाले की, अजित पवारांकडे शेवटची जी फाईल होती ती फाईल माझी होती. जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नये असे सांगण्यात आलं आहे. कुणी सांगितलं हे स्पष्ट नाही, भाजपने सांगितलं की त्यांच्या पक्षाने माहिती नाही, असे म्हणत जय पवार यांच्यावरही दबाव असल्याचं रोहित पवारांनी सूचवलं आहे. व्ही. के. सिंगच्या मुलाच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल होते, ते त्याची मदत करत आहेत का? सामान्य लोकांना हा विश्वासघात वाटतो. दादांबरोबर राहिलेला नेता लग्नाला उपस्थित होता, त्यांनीही विश्वासघात केला आहे. सिंगला वाचवलं नाही तर तो आपलं नाव सांगेल अशी भीती काही जणांना असू शकेल, असे म्हणत पुन्हा एकदा रोहित पवार यांनी प्रफुल पटेलांना लक्ष्य केलंय. जय पवार तुमचाच भाऊ,फोन करायला पण वेळ नाही का? आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन अजित पवारांच्या अपघात तपाससंदर्भात चर्चा केली. त्यानंतर, भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा अपघात होतात तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. चौकशीचे आदेश काँग्रेसच्या काळात देखील दिले जात नव्हते, ते प्रोटोकॉल आहेत, असे म्हणत भाजप नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रोहित पवारांकडून होत असलेल्या आरोपावर आणि वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, जय पवार यांच्या पत्रकार परिषदेरुन रोहित पवारांनी सवाल उपस्थित केले असता, त्यांनी जोरदार पलटवार केला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी पती गमावला आहे, पतीचे दुःख मोठे आहेत, त्या पण काळजी घेतील ना, दोन चिरंजीव आहेत असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी रोहित पवारांकडून सातत्याने होत असलेल्या गाठीभेटी आणि मागण्यांवरुन टोला लगावला. विमान अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे का? तर होत आहे, शंकास्पद काही करू नये. शंका का घेत आहेत, तुमच्या काकी आहेत, त्या पण मदत करतील ना. जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? हवेत का बोलत आहात. मी व्यवस्था करतो फोन करायला, देवेंद्रजींना सांगून फ्री टेलिफोनची व्यवस्था करायला सांगतो. पत्रकार परिषद घेणार होता बेटा, का नाही घेतली एकदा विचार तर ना? अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला. देव दर्शनाला जाताना भाविकांवर काळाचा घाला राजस्थानातील सालासर रोडवर एक भीषण अपघाताची घटना घडलीय. या अपघातात नागपूरच्या कामठीत राहणाऱ्या पारसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. यात आई, वडील आणि मुलगा जागीच ठार झाला आहे. तर इतर सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. राजस्थानातील खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असून भाविकांवर काळानं घाला घातला आहे. या घटनेनं नागपूरच्या कामठीमध्ये खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम यांचा समावेश आहे. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना टवेरा गाडीला पिकअपने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि यात दोन्ही वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. तर पारसे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सालासर येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कामठीतील कचरीपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. गॅस सिलिंडरसाठी पहाटेपासून एजंसीसमोर रांगा जिल्हा प्रशासनाकडून नांदेड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पुरेसा असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर गुरुवारी पहाटेपासूनच नागरिकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. सिलिंडर मिळेल की नाही या भीतीमुळे नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात घरगुती गॅस पुरेसा उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगत असताना रांगा लागण्यामागे काळाबाजाराचेही कारण असू शकते, अशी चर्चा आहे. नांदेड शहरात एक हजारपेक्षा अधिक हॉटेल्स, मेस व खानावळी, भोजनालये सुरू आहेत. या ठिकाणी व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येते. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असला तरी याबाबत कारवाई अत्यल्प प्रमाणात झाली आहे. मागील काही दिवसांत गॅस दरवाढ, व्यावसायिक गॅस पुरवठ्यात आलेला अडथळा आणि घरगुती गॅससाठी सुरू करण्यात आलेली ‘ओटीपी’ प्रणाली यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्याचबरोबर गॅस बुकिंगसाठी वापरले जाणारे मोबाइल क्रमांक लागत नसल्याच्या तक्रारीही अनेक ग्राहकांकडून केल्या जात आहेत. चूक सुधारण्यासाठी उरले फक्त १५ दिवस लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांनी प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला. मुदतीपूर्वीअनेक लाभार्थ्यांनी केवायसी केले आहे. परंतु लाखो लाभार्थ्यांनी केवायसी केले नाही. याचसोबत अनेक महिलांनी केवायसीमध्ये चुका केल्या आहेत. या चुकांमुळे महिलांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान, आता त्यांना चुका सुधारण्यासाठी एक संधी दिली आहे. महिला ३१ मार्चपर्यंत केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकतात. यासाठी आता फक्त १५ दिवस उरले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनह केवायसी केले नाही त्यांनी लगेच करावे. अन्यथा महिलांना १५०० रुपयांचा लाभ कायमचा बंद केला जाईल. लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचा लाभ बंद केला आहे. अनेक महिला निकषात बसत नाही तर अनेक महिलांनी केवायसी केली नाही. त्यामुळे त्यांचा लाभ बंद केला आहे. याचसोबत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन केलेल्या पडताळणीत महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. पीएम किसानचा हप्ता जमा होणार Top 10 news: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहे. जवळपास ९.३२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामच्या गुवाहाटीमधून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत. आसामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर आहेत.तिथेच एका कार्यक्रमात ते पैसे ट्रान्सफर करणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेचे लष्करी विमान KC-135 कोसळलं अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भयंकर युद्ध सुरूच आहे. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर या युद्धात मृतकांचा आकडा हजारोंच्या घरात गेला आहे. अशातच आता इराकमध्ये अमेरिकन सैन्याचे इंधन भरणारे विमान कोसळल्याची माहिती आहे. इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांचे KC-135 इंधन भरणारे विमान कोसळल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितलय. घटनेनंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली. या घटनेत दोन विमानांचा सहभाग असून एक विमान पश्चिम इराकमध्ये कोसळले, तर दुसरे सुरक्षितपणे उतरल्याची माहिती आहे. अमेरिकन सैन्याने सांगितले की, दोन विमाने यात सहभागी होती. एक विमान सुरक्षितपणे उतरले, तर दुसरे क्रॅश झाले. लष्कराने म्हटले की हा अपघात शत्रूच्या गोळीबारामुळे किंवा मैत्रीपूर्ण गोळीबारामुळे झाला नाही. सध्या बचाव मोहीम सुरू आहे आणि तपास सुरू आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कोमात ? इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नुकतेच निवड झालेल्या मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक दावे विविध माध्यमं आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन केले जात आहेत. हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी यांनी एक पाय गमावला असून, ते कोमात असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर मोजतबा यांच्या सोशल मीडियावरील खात्यावर देखील त्यांचा ‘एआय’निर्मीत फोटो वापरल्याचा दावा केला जात आहे. अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला त्याच हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा यांनी या हल्ल्यात एक पाय गमावला असून, सध्या ते कोमात आहेत, असे म्हटले आहे. पण, इराणी अधिकारी आणि सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मोजतबा सुरक्षित असून, सर्वोच्च नेत्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे इराणने म्हटले आहे. विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही’ चा फटका आता हॉटेल्स आणि कारखान्यांसोबतच शाळांसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांनाही बसत आहे. ‘भारतपे’चे (BharatPe) माजी संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मुलांच्या गुरुग्राम आणि दिल्ली येथील ‘द श्री राम स्कूल’ या शाळेकडून आलेला एक ईमेल शेअर केला आहे. या ईमेलद्वारे शाळेने पालकांना माहिती दिलीय की, मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅसचा तुटवडा असल्याने शाळेच्या कंत्राटदाराला मुलांच्या दुपारच्या जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी पुरेसा एलपीजी गॅस उपलब्ध होत नाही. त्यांच्याकडे केवळ दोन दिवसांचा गॅस साठा शिल्लक असून पालकांना मुलांच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. या परिस्थितीवर उपहासात्मक भाष्य करत, “टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाहीये”असं म्हटलंय. अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्यानंतर आणखी एका मित्राला गमावले आहे. त्यांनी पोस्टद्वारे ही दुःखद बातमी सर्वांशी शेअर केली. आपल्या प्रिय मित्राच्या निधनानंतर, ‘बिग बी’ यांनी एक भावुक पोस्ट केली. आपल्या दिवंगत मित्राला श्रद्धांजली वाहताना, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत हृदयस्पर्शी संदेश लिहिला.ज्यात त्यांनी, “प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा मार्ग त्याला नेहमीच सापडायचा. तो एक अत्यंत प्रेमळ आणि उत्तम माणूस होता.मी माझा आणखी एक अत्यंत प्रिय मित्र गमावला आहे. तो नेहमीच आनंदी असायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य फुललेले असायचे. तो आता आपल्यात राहिला नाही, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. एक-एक करून, सगळे सोडून जात आहेत.” असं त्यांनी म्हटलंय.