सात करोड वर्षांपूर्वीचा सापळा पाहून संशोधकही हैराण
ब्राझिलिया: ब्राझीलमध्ये एका प्रदेशांमध्ये तब्बल सात कोटी वर्षांपूर्वीच्या एका डायनासोरचा सांगाडा सापडले आहे. हा सांगाडा एका दंतहीन अशा डायनासोरचा असल्याने संशोधक हैराण झाले आहेत. दात नसलेला हा डायनासोर दोन पायावर चालत होता.
संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हे अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण संशोधन मानावे लागणार आहे. या प्रकारची डायनासोरची जात खूप लहान असून हा डायनोसॉर थोरोपॉड नावाने ओळखली जातो. तर या डायनोसॉरची प्रजाती बेर्थासौर लिओनोदायनाई ही आहे. या प्रजातीतील डायनासोरची उंची कमी म्हणजे तीन फूट ते चार फूट असू शकते या डायनासोरचे तोड चोचीच्या आकाराचे असते आणि या तोंडामध्ये कोणत्याही प्रकारचे दात नसतात.
एखाद्या पक्षाप्रमाणे त्याचे काम चालते पक्षी ज्याप्रमाणे चोचीच्या माध्यमातून चावण्याचे काम करतात.तसेच हा डायनासॉर करत होता. ब्राझीलच्या नॅशनल म्युझियमने या संशोधनाची माहिती दिली असून त्याबाबत एका जर्नलमध्ये लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनाचे नेतृत्व जिओवाने अल्वेस यांनी केले होते. काही काळापूर्वी अशाच प्रकारचा एक डायनासॉर चीनमध्ये आढळला होता.
त्या डायनासोरचा काळ सुमारे 18 कोटी वर्षांपूर्वीचा होता पण तोंडात दात नसलेले आणि चोचीसारखे तोंड असलेले हे डायनासोर काय खात असावेत याबाबत संशोधकांना प्रश्न पडले आहेत. ज्याप्रमाणे पक्षी आपल्या चोचीच्या माध्यमातून सर्व प्रकारचा आहार करू शकतात. त्याच प्रकारे व्यवहार हा डायनासोर करत असावा असा अंदाज आहे. आगामी कालावधीमध्ये या डायनासोरबाबत अधिक संशोधन केले जाणार आहे.