मुंबई – प्रजासत्ताक दिनापुर्वी पोएटिक जस्टीस फाउंडेशनच्या झूम कॉल मिटिंगला आपण उपस्थित असल्याची कबुली मुंबईतील वकील आणि कार्यकर्त्या निकीता जेकब यांनी दिली. जेकबच्या वकिलांनी मुंबई पोलिसांकडे सोपवलेल्या कागदपत्रांवरून या मिटींगला फाउंडेशनचे संस्थापक एमओ दहिवाल, दिशा रवी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
एक्स्टिंशन रिबेलीयन (एक्सआर) इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हे टुलकिट बनवले. त्यात आंतरराष्ट्रीय समुदायाला समजेल अशा भाषेत असणारा मजकूराचे अनौपचारिक पॅक होते. त्याचा हेतू हिंसाचार भडकावण्याचा नव्हता, असा दावा जेकबने केला आहे.
गोरेगावमध्ये राहणाऱ्या जेकबने स्विडिश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला कोणतीही माहिती शेअर केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. जनजागरणासाठी टुलकीटच्या प्रसारात, संपादनात, चर्चेत किंवा संशोधनात कोणताही राजकीय, धार्मिक किंवा आर्थिक हेतू नव्हता, असे तीने म्हटले आहे.