टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांना न्यायालयाकडून दिलासा

नवी दिल्ली – ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणातील संशयित अ‍ॅड. निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी अटक वॉरंट जारी केलेल्या निकिता जेकब यांच्या प्रवासी अटकपूर्व जामिनावर न्यायालयाने आज निकाल दिला. यावेळी निकिता यांना न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दिशा रवी यांना अटक केल्यानंतर अ‍ॅड. निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजवाले. व दिल्ली पोलिसांनी अटकेचे प्रयत्न सुरू केले होते. यानंतर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बीड येथील मूळचा आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असणारा शंतनू मुळूक यांचा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केलेला अर्ज मंजूर केला. त्याला संबंधित न्यायालयात अर्ज करण्यासाठी १० दिवसांचा प्रवासी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी दिशा रवीसह मिळून खलिस्तानवादी गटांच्या सहकार्याने टुलकिट तयार केले. त्यांनी ते स्विडीश पर्यावारणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गपर्यंत पोहोचवले, असा दावा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.