“यूके एशियन फिल्म फेस्टिव्हल’ च्या उद्घाटनासाठी “तुफान मेल’ या भारतीय सिनेमाची निवड करण्यात आली आहे. 70 व्या दशकातील घटनांवर आधारित या सिनेमाद्वारे आकृती सिंहने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.
या सिनेमाची एक खासियत म्हणजे या सिनेमाच्या प्रॉडक्शनसाठी सार्वजनिक वर्गणी गोळा केली गेली आहे. दिग्दर्शक म्हणून आकृती सिंहचा हा पहिला सिनेमा असला तरी यापूर्वी तिने अनेक स्टेज शो आणि सिनेमांमधूनही काम केले आहे. त्यामध्ये ब्रोकन बट ब्यूट्फुल, ब्रीद, कामयाब, फोटोग्राफ आदी सिनेमांचा समावेश आहे. तिने 14 नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. “तुफान मेल’चा विषय आशेचा किरण असा आहे.
एकदा “यूके एशियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दाखवल्यानंतर इतर काही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा सिनेमा दाखवला जाणार आहे. 70 च्या दशकातील घटनांवर आधारित असल्याने या सिनेमाशी संबंधित सर्व वातावरणावर कालमर्यादेची बंधने आहेत. त्यामुळे कदाचित अलीकडच्या काळातील प्रेक्षक या सिनेमाशी जोडणे कठीण आहे, हेही आकृती सिंहने मान्य केले आहे.