अमेरिकेतील उत्पादनांवर भारतात खूप जास्त कर अमान्य

वॉशिंग्टन – अमेरिकेतील उत्पादनांवर भारतात खूप जास्त कर असल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्‍त केली आहे. “जी-20′ परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींबरोबरच्या महत्वाच्या चर्चेपूर्वीच ट्रम्प यांनी हे वाढीव कर मागे घेण्याची मागणी केली आहे.

ट्रम्प यांनी “अमेरिका सर्वप्रथम’ या धोरणाचा पहिल्यापासून आग्रह धरला आहे. अमेरिकेच्या उत्पादनांवर भारताकडून खूप जास्त कर लावले गेले असल्याने त्यांनी भारताला “कर सम्राट’ असे संबोधले आहे. भारताने अगदी अलिकडेच वाढवलेले हे कर कमी करायला हवेत. याबाबत पंतप्रधान मोदींशी आपण चर्चा करणार असल्याचे ट्रम्प यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेने भारताला व्यापार प्राधान्य यादीतून काढल्यावर भारताने अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या बदाम, डाळी आणि अक्रोडसारख्या 28 वस्तूंवर वाढीव कर लावले आहेत. अमेरितेलील हर्ले डेव्हिडसन- सारख्या उच्च प्रतीच्या मोटरसायकलींवरच्या वाढीव करांवरही ट्रम्प यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यातटीका केली आणि भारतातून निर्यात होणाऱ्या मोटर सायकलींवरील कर वाढवण्याची धमकी दिली होती.

अमेरिकेने गेल्या वर्षी भारतातील स्टील आणि ऍल्युमिनियमच्या वस्तूंवरील कर वाढवले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेला जागतिक व्यापार संघटनेच्या तंटा निवाडा लवादामध्ये खेचले होते. याशिवाय 21 जूनला महिन्यात अमेरितेलील हर्ले डेव्हिडसन- सारख्या उच्च प्रतीच्या मोटरसायकलींवर 50 टक्के वाढीव कर लावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.