नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक पत्रकदेखील जारी केले आहे. प्रल्हाद जोशी यांनी यंदाचे हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
“राज्यात मंदिरे खुली मग लोकशाहीचं मंदिर का बंद ठेवलंय’?
आता थेट जानेवारीत सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करू शकते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अनुकूलता दर्शवली आहे. यातच हिवाळी अधिवेशन रद्दच्या मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप टीका केली आहे. तर आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही मोदी सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.
A state election has taken place..huge rallies roared for the same. Entire country has pretty much reopened except the #Parliament where laws r bulldozed without all party consultations anyway #TooMuchDemocracy indeed pic.twitter.com/IGuTB2tjti
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 15, 2020
काय म्हणाल्या अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर
‘राज्यात जेव्हा निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी मोठ्या सभा घेण्यात आल्या. म्हणजे संसद वगळता सर्व देश खुला आहे. खूपच लोकशाही आहे (टू मच डेमोक्रॉसी)’ असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.