जयपूर – राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात ट्रेलर-जीपच्या भीषण अपघातात बहिण भावांसह एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नॅशनल हायवे 52 वर झाला असून खाटू शामजींच्या दर्शनाहून येत असताना ट्रेलरने जीपला धडक दिल्याने जीपमधील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने अपघातात तीन वर्षाची चिमुकली बचावली आहे.
Sad to know that eight people have lost lives in a road accident in Tonk, while returning from Khatushyam ji to their town in MP. My heartfelt condolences to the bereaved family members. May they remain strong in this difficult time & prayers for speedy recovery of those injured.
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) January 27, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. यातील दोघे चुलत भाऊ हे 25 दिवस चालून खाटू शाम यांचे दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर कुटुंबातील इतरजण दोन जीप घेऊन त्यांना आणण्यासाठी खाटू शाम येथे आले होते. दर्शनाहून परतत असताना नॅशनल हायवे 52 वर ट्रेलरेने जीपला धडक दिली. यात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरूष, दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
अपघातात रामबाबू आणि शाम सोनी हे दोन सख्खे भाऊ, रामबाबू यांचा एकूलता एक मुलगा नयन आणि श्याम सोनी यांचा मुलगा ललित, ममता आणि बबली या दोन बहिणी, ममता यांचा मुलगा अक्षत, मुलगी अक्षिता यांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने नन्नू नावाच्या तीन वर्षाच्या मुलीचा जीव वाचला आहे.
क्रेन च्या मदतीने जखमींना बाहेर काढले –
अपघात एवढा भीषण होता की यात ट्रेलरची धडक आणि पुल यांमध्ये जीप पूर्णपणे दबली होती. सर्व कुटुंबीय गाडीतच अडकले होते. अपघातात काही जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती पाहून जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.