पुणे: आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या जॅक लौतीत, अर्णव पतंगे यांनी तर, मुलींच्या गटात तोमको कातो या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत एकेरीत मुलींच्या गटात पात्रता फेरीतून भारताच्या अर्णव पतंगे याने चेक प्रजाकसत्ताकच्या मथास मुसीलचा 2-6, 6-4, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. न्यूझीलंडच्या जॅक लौतीत याने जपानच्या दायसुके इनग्वा याचा 7-5, 5-7, 7-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
भारताच्या देव जावीया याने क्वालिफायर आदित्य बलसेकरचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मुलींच्या गटात जपानच्या तोमको कातो हिने भारताच्या विपाशा मेहरावर 4-6, 6-7(4), 6-4 असा विजय मिळवला. चीनच्या थियांमी मी हिने थायलंडच्या सलकथिप ओनमूआंगचा 6-2, 7-5 असा पराभव करून आगेकूच केली.
रशियाच्या मारिया शोल्कोवा हिने क्वालिफायर सायना देशपांडेचा 6-1, 6-1 असा सहज पराभव केला. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या वैष्णवी आडकर हिने विजयी मालिका कायम ठेवत चीनच्या क्यूओनयू लुईचे आव्हान 5-7, 6-3, 6-1 असे संपुष्टात आणले.