मेलबर्न – भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर हे सध्याच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मुडी यांनी व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक संघांकडे सलामीसाठी अनेक आक्रमक फलंदाज आहेत. ते आपली गुणवत्ताही सिद्ध करत आहेत. परंतु रोहित आणि वॉर्नर यांच्याकडे अन्य फलंदाजांपेक्षा जास्त गुणवत्ता आहे. सामना कोणताही असो, गोलंदाज कोणीही असो किंवा कोणतीही खेळपट्टी व वातावरण असो या दोघांच्या शैलीत कधीच बदल होत नाही. गोलंदाजांचे दडपण त्यांच्यावर कधी आल्याचे मी पाहिलेले नाही. आजच्या घडीला अनेक देशांचे नवोदीत खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. मात्र, मला भारताचा नवोदीत खेळाडू शुभमन गिलकडून जास्त अपेक्षा आहेत. त्याचा खेळ पाहुन मी खूप प्रभावीत झालो आहे, असेही मुडी यांनी स्पष्ट केले.