मुंबई- लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांते अत्यंत लाडके कार्टून टॉम अँड जेरी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अतिशय लोकप्रिय असलेल्या या दोघांवर अधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
हा चित्रपट थ्रीडी लाईव्ह अॅनिमेशन असून यात टॉम आणि जेरी या दोन अॅनिमेटेड व्यक्तिरेखांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य कलाकारांसह टॉम जेरी ही पात्र प्रेक्षकांना अॅनिमेटेड स्वरुपात पाहायला मिळणार आहे.
काही वर्षांपुर्वी या जोडीने अनेकांना खळखळून हसवलं. लहानांबरोबरच मोठ्यांपर्यंत अनेकांना आपली भूरळ घातली. ही भूरळ आता ट्रेलरनेसुद्धा पाडली आहे. या ट्रेलरमध्ये सुद्धा टॉम जेरीची जोडी धुमाकूळ घालताना दिसते आहे.
दरम्यान, हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला 2 लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत.
View this post on Instagram