नवी दिल्ली – कोरोना व्हायरसने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळलेल्या देशांची संख्या 60 पेक्षा जास्त झाली असून, आतापर्यंत या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या जगभरात 3000 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. याचा परिणाम आगामी ऑलिम्पिकवरही होण्याची शक्यता आहे.
ऑलिम्पिक खेळांसाठी महाकुंभ मानले जाते. चार वर्षातून एकदा ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येते. यंदा जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोनाचे सावट ऑलिम्पिकवर आहे. यामुळे जर परिस्थिती नियंत्रणात आली नाहीतर ऑलिम्पिक रद्द करण्यात येईल, असे मत जपानने व्यक्त केले आहे.
दरम्यान, १२४ वर्षाच्या कालखंडात आतापर्यंत केवळ तीन वेळाच ऑलिम्पिक रद्द करण्यात आले आहे. विश्व युद्धामुळे ऑलिम्पिक रद्द झाले होते.