टोकियो :- करोनामुळे यंदा होत असलेले ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आले असले तरी पॅरालिम्पिक स्पर्धेचे वेळापत्रक मात्र पुढील वर्षीही तसेच राहणार असल्याचे जपान ऑलिम्पिक संघटनेने जाहीर केले आहे.
करोनाचा धोका वाढल्याने यंदा जुलैपासून सुरू होणारे ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, पुढील वर्षीही त्याच तारखांना पॅरालिम्पिक स्पर्धा होतील असे सांगण्यात आले आहे. या स्पर्धेला पुढील वर्षी 24 जुलैपासून प्रारंभ होणार असून 5 सप्टेंबरला स्पर्धेचा समारोप होणार आहे. त्यापूर्वी एक दिवस म्हणजे 23 जुलैपासून मुख्य ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत असून ही स्पर्धा 8 ऑगस्टला संपणार आहे.