Tokyo Olympics : नुरीस्लामने घेतला होता रवीचा चावा

टोकियो – भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहियाने 57 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नुरीस्लाम सनायेवचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पण या सामन्यात रवीला कझाकिस्तानच्या नुरीस्लाम सनायेवने चावा घेतल्याचे उघड झाले आहे. 

ही घटना सामना सुरू असतानाच घडली असली तरीही ती कोणालाही कळली नाही. पण रवी दहिया मात्र ही गोष्ट सहन करत राहिला आणि त्याने सामना सोडला नाही. या सामन्यात अत्यंत धैर्य दाखवत रवी दहियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

कझाकिस्तानच्या नुरीस्लाम सनायेवविरुद्ध रवी कुमारने 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर नुरीस्लामने रवी कुमारविरुद्ध 9-2 अशी मोठी आघाडी घेऊन धक्‍का दिला. पण रवीने थाटात पुनरागमन केले आणि विजय मिळवला.

रवीने बल्गेरियाच्या जॉर्जी वालेंटिनो वांगेलोव याचा तांत्रिक गुणांच्या आधारे पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. रवीने जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा (2019), 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा (2018) आणि आशियाई कुस्ती स्पर्धा (2020 आणि 2021)मध्ये पदके जिंकली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.