नवी दिल्ली – ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती बॅडमिंटनपटू कॅरोलिन मरिन हिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सराव करताना तिच्या गुडघ्याला त्रास जाणवत होता. आता या आठवडयात तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.
दरम्यान मरिनची माघार भारताच्या पी. व्हि. सिंधूच्या पथ्यावर पडली आहे. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे निदान झाले. त्यामुळे या आठवडयात गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असून त्यातून सारवण्यासाठी बराच वेळ लागणार आहे, असे मारिनने म्हटले आहे.
टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला 23 जुलैपासून सुरुवात होत असून मरिनला विजेतेपदाची संभाव्य दावेदार मानली जात होती. यंदाच्या मोसमात भरात मरिनने पाचपैकी चार स्पर्धाच्या अंतिम फेरीत धडक मारून विजेतेपदे मिळवले आहे.
2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मारिनने सिंधूवर मात करत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, यंदा तीच्या माघारीमुळे सिंधूला सोपा ड्रॉ मिळणार आहे तसेच पदकाची संधीही विढणार आहे. 2019 साली देखील मरिनच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.