नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी ज्या पात्रता स्पर्धा येत्या काळात होणार आहेत त्यांचे वेळापत्रक देखील येत्या काही दिवसांमध्ये जाहीर केले जाणार आहे. सर्व क्रीडा संघटनांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) केले आहे.
करोनाच्या धोक्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने सहभागी देशांच्या आणखी काही खेळाडूंना या स्पर्धेत पात्र ठरण्याची संधी आहे. करोनाचा धोका ज्या ठिकाणी कमी आहे व तेथील सरकारने सराव व स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी दिली आहे त्यांनी स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करावे, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.