टोकियो : सर्व भारतीयांचे लक्ष असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकीच्या सेमीफायनलमध्ये भारताचे पदकाचे स्वप्न भंग झाले आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यात झालेल्या सेमीफायनलमध्ये बेल्जीयमने भारताचा पराभव केलं आहे. सुरुवातीला मॅच खूपच अटीतटीची झाली मात्र भारतीय हॉकी संघाला विश्वविजेत्या बेल्जियमने 5-2 ने पराभूत केले.
मॅच सुरू होताच बेल्जियमने भारतीय हॉकी टीम विरुद्ध पहिला गोल केला. त्यानंतर भारतीय टीमने सुद्धा बेल्जियम विरुद्ध गोल करत बरोबरी केली. यानंतर भारतीय टीमने आणखी एक गोल करत 2-1 ने आघाडी घेतली. मग, बेल्जियमच्या टीमने सुद्धा गोल करत 2-2 ने बरोबरी केली. त्यानंतर पुन्हा बेल्जियमच्या टीमने एका मागे एक असे दोन गोल करत 5-2 ने आघाडी घेतली आणि विजय मिळवला.
I’m watching the India vs Belgium Hockey Men’s Semi Final at #Tokyo2020. Proud of our team and their skills. Wishing them the very best!
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2021
पंतप्रधान मोदी सुद्धा पाहत होते मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भारत विरुद्ध बेल्जियम ही सेमीफायनल मॅच लाईव्ह पाहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारतीय टीमला प्रोत्साहन दिले आणि शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलं, मला माझ्या टीमचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे.
भारत विरुद्ध बेल्जियम मॅचेसची आकडेवारी 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने भारताचा 3-0 ने पराभव केला होता. तर 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने 3-1 ने पराभूत केले होते.