टोकियो – यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त खेळ करणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळालं आहे.
अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव करून कांस्यपदकावर कब्जा केला. सर्वच स्तरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भारतीय पुरुष हॉकी संघाचं कौतुक केलं आहे.
Historic! A day that will be etched in the memory of every Indian.
Congratulations to our Men’s Hockey Team for bringing home the Bronze. With this feat, they have captured the imagination of the entire nation, especially our youth. India is proud of our Hockey team. 🏑
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2021
ट्विट करत पंतप्रधानांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. “ऐतिहासिक! आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील. देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंचं अभिनंदन. या विजयाने प्रत्येक भारतीयाच्या मनातील स्वप्न साकार झालं आणि तरुणाईला उमेद दिली..” असं ट्विट मोदींनी केलं आहे.
दरम्यान, आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. आणि त्यानंतर आज या पदकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.