Tokyo Olympics : बॉक्‍सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत

टोकियो -टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेट कॅटेगरीमध्ये भारतीय बॉक्‍सर सतीश कुमारने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 16 व्या फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1 ने पराभूत केले. सतीशच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

पहिल्या दोन फेरीत सतीशने रिकार्डोला गारद केल्याने तिसऱ्या फेरीत सतीशचा सामना करणं त्याला जवळपास अशक्‍य झालं. पहिल्या फेरीत सतीशने प्रभावी खेळ करून पंचांची आणि उपस्थितांची मने जिंकली, तर दुसऱ्या फेरीत त्याने अप्रतिम राईट हुक आणि बॉडी शॉट्‌स वापरून रिकोर्डोला चित केले.

मात्र आघाडी घेतली असतानाही सतीशने कुठलाही धोका न पत्करता चतुराईने खेळत सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. सतीश कुमार मूळचा बुलंदशहरमधील पचौता गावचा आहे.

सतीश कुमारची वाटचाल…

2010 – उत्तर भारत एरिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
2011 – नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रौप्य
2014 – आशियाई खेळामध्ये कांस्यपदक
2015 – आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक
2018 – कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.