Tokyo Olympic : स्पर्धा रद्द झाल्यास अब्जावधी डॉलर्सचा फटका

ऑलिम्पिकबाबत जपानमध्येच विरोध

टोकियो – जपानमध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या पाहणीतून त्यांच्याच नागरिकांचा ऑलिम्पिक स्पर्धेला विरोध वाढतआहे. देशातील जवळपास 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लोकांनी यंदाचे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलले जावे किंवा रद्द केले जावे असे मत व्यक्त केले आहे.

हा यजमान जपानला मोठा धक्का देणारा अहवाल ठरला आहे. जर असे झाल्यास जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा रद्द केल्यास 4.5 ट्रिलियन येनचे (जवळपास 3.15 लाख कोटी रुपये) नुकसान होईल. यात सरकार, आयोजन समिती, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, हॉटेल, स्थानिक बाजार आदींच्या नुकसानीचा समावेश आहे.
मात्र, स्पर्धा पुढे ढकलल्याने यापूर्वीच जवळपास 42 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण, स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या क्रीडा साहित्य व सुविधांच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी आयोजक नवे पर्याय शोधत आहे. त्यांच्यानुसार, स्पर्धा पुढे ढकलल्या किंवा रद्द झाल्यास 480 मिलियन डॉलर (जवळपास 3500 कोटी रुपये) इन्शुरन्समधून मिळतील.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यातून मार्ग काढणत अनुकुल वातावरण तयार व्हावे यासाठी आयोजकांनी ऑलिम्पिकच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात ऑलिम्पिकची दोन ठिकाणे टोकिओ व योकोहामामध्ये बेसबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. प्रेक्षकांमध्ये एक आसन रिकामे सोडण्यात आले होते. त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले होते. ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टेशन तयार करण्यात आले होते. स्पर्धा वर्षभरापासून स्थगित झाल्यानंतर तयार मैदानांच्या देखभालीवर अधिक खर्च होत आहे.

जपानचे खेळाडू स्पर्धा आयोजित करावी किंवा नाही, या वादापासून अंतर राखून आहेत. खेळाडूंसाठी सर्वात मोठा मुद्दा अनिश्‍चिततेचा आहे. ते म्हणतात, जर स्पर्धा जुलैमध्ये होणार असेल, तर त्या पद्धतीने तयारी करावी लागेल. होणार नसेल तर तयारीत बदल करावा लागेल.

आयोजन खर्चात होतेय वाढ…

टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा आयोजानचा सुरुवातीचा खर्च 25 बिलियन डॉलर (1 लाख 82 हजार कोटी) होता. यासाठीचा निधीही मंजूर आणि उपलब्ध झाला होता. मात्र, मार्च महिन्यात जगभरात करोनाने धुमाकूळ घातला. यामुळे स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलावी लागली. याचा आर्थिक स्वरूपात मोठा धक्‍का बसला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.