टोकियो – भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभवाला समोरे जावं लागले. चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग हिने भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभूत केलं. सिंधूनं हा सामना 18-21,12 – 21 असा गमावला.
ताई जू यिंग सध्या जगातील अव्वल खेळाडू आहे. तिच्या नावावर आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक, तीनदा ऑल इंग्लंड किताब आणि पाचदा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची वर्ल्ड सुपर सीरिज जिंकल्याचा विक्रम आहे. सिंधूनं आतापर्यंत ताई जू यिंग हिच्याविरुद्ध 19 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 5 वेळा तिला विजय मिळवता आला.
सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला. यासोबतच तिनं अंतिम चारमध्ये स्थान पक्कं केलं. त्यामुळे सिंधूला कांस्यपदक मिळविण्याची संधी आहे.
याआधी सिंधूने रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. अंतिम सामन्यात तिला पराभवाला सामोरे जावं लागलं होतं.