नवी दिल्ली : चीनसह संपूर्ण जगभर पसरत असलेल्या करोना विषाणूंचा धोका आता टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेलाही बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. करोनाची लागण सर्वात जास्त चीनमध्ये झाली. आता हा धोका जगभर पसरत आहे.
क्रीडा जगतातील सर्वात मोठ्या स्पर्धेला म्हणजेच आॅलिम्पिकलाही आता या स्पर्धेमुळे धोका निर्माण झाला आहे. जुलैमध्ये ही स्पर्धा होत असून करोना विषाणूंच्या प्रसारावर लवकर नियंत्रण मिळवले नाही तर संपूर्ण जग या विषाणूंच्या कक्षेत येईल.
दरम्यान, यामुळे आॅलिंपिक पात्रता फेरीसाठी महत्वाच्या मानल्या जात असलेल्या जर्मन ओपन आणि पोलंड ओपन या बॅडमिंटन स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील काही महिन्यात या विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाला नाही तर, टोकियो आॅलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याचीही शक्यता आहे.
अमेरिकेतील वैदयकीय संस्थेने हा विषाणूंचा प्रसार जगभर पसरणार असल्याचा इशारा दिला आहे. चीनसह इटली, इराण, दक्षिण कोरिया, क्रोएशिया व स्वित्झर्लंडमध्येही याचे रूग्ण आढळले आहेत.