स्फोटके बनवण्यात तरबेज असणारा तोयबाचा दहशतवादी ठार

श्रीनगर  – जम्मू-काश्‍मीरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी नासीर नावाच्या खतरनाक दहशतवाद्याला ठार केले. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा सदस्य असणारा नासीर स्फोटके बनवण्यात तरबेज होता.

दक्षिण काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली. एका दहशतवाद्याचा ठावठिकाणा समजल्यानंतर सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला वेढले.

दहशतवाद्याला प्रथम शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून दहशतवाद्याने गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दहशतवादी मारला गेला. ठार दहशतवादी नासीर उर्फ शकिल साब उर्फ शाक भाई असल्याचे उघड झाले. परदेशी नागरिक असणाऱ्या नासीरचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.