“ईव्हीएम’ विरोधात आज आंदोलन

पिंपरी – ईव्हीएम हटाओ, आरटीआय बचाओ जनआंदोलन समितीच्या वतीने उद्या (गुरुवारी) पिंपरीत ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन होणार आहे.

याबाबत माहिती देताना जनआंदोलन समितीचे मुख्य समन्वय मारुती भापकर म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये बदल करुन माहिती आयोगाच्या स्वायतेवर घाला घातला आहे. हा कायदा निष्प्रभ केला. तसेच आपल्या देशात निवडणुकीमध्ये इलेक्‍ट्रॉनिक व्होटींग मशीनव्दारे (ईव्हीएम) मतदान घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पडते. याबाबत आक्षेप होत असल्याने ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर विधानसभेची निवडणूक घेण्याची मागणी आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.